नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी मनीषा खत्री यांची नियुक्ती

नाशिक : गेल्या अनेक वर्षांनंतर नाशिक महानगरपालिकेला राहुल कर्डीले यांच्या रूपाने आयएएस अधिकारी मिळाल्याचा आनंद नाशिककरांना फक्त काही तास साजरा करता आला आणि नाशिक जिल्ह्याच्या होणाऱ्या पालकांना, संकटमोचक व मंत्री महोदयांना हा निर्णय न आवडल्याने काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती दिल्याचे कळते. त्यांच्या जागी आता एनएमआरडीएच्या आयुक्त मनीषा खत्री यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षात नाशिक महानगरपालिकेला तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारा एकही आयुक्त मिळाला नसल्याने याचा थेट परिणाम नाशिकच्या विकासावर झाल्याचे चित्र आहे.त्यानंतर अशोक करंजकर याची नियुक्ती करण्यात आली मात्र 55 कोटींचा धनादेशाच्या चक्रात ते अडकले त्याचबरोबर वाढता राजकीय हस्तक्षेप यामुळे ते रजेवर असायचे त्यांनतर लोकसभा आणि विधानसभेच्या आचारसंहितेमुळे महापालिकेचा संपूर्ण कारभार प्रशासकीय राजवटीकडे गेला आणि भरकटलेल्या कारभारामुळे तक्रारी वाढत असल्याने नाशिकसाठी आयएएस अधिकारी द्यावा अशी मागणी वाढत असल्याचे बघून राहुल कर्डीले यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र या नियुक्तीमुळे नाशिकचे होणारे पालक व संकटमोचक नाराज झाले. याला देखील अनेक कारणे आहेत. आगामी सिंहस्थासाठी नाशिकवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी त्यांना आपल्या मर्जीतील अधिकारी हवा होता. राहुल कर्डिले यांची नियुक्ती होणाऱ्या पालकमंत्री साहेबांना विश्वासात न घेता झाल्याची माहिती मिळत आहे. एनएमआरडीएच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाली असून होणाऱ्या पालकमंत्र्यांना नको असलेले राहुल कर्डीले मात्र आमदारांना हवे-हवेसे वाटत असल्याची माहिती मिळत असून आता मंत्रीमहोदय आणि आमदारांमध्ये कलगीतुरा रंगतो की मंत्रिमहोदयांन बरोबर जुळून घेतले जाते ते येत्या काही दिवसात कळेलच मात्र केलेली स्थगिती आणि झालेली नियुक्ती याबाबत महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.

![]()












