• Latest
  • Trending
भाजप आमदारांचे काय चुकले ?

भाजप आमदारांचे काय चुकले ?

December 17, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

भाजप आमदारांचे काय चुकले ?

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

जिल्हात भाजपचे पाच आमदार तरीदेखील मंत्रिपद नाही

नाशिक : नाशिक जिल्ह्यात शिंदे गटाच्या शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले. तर नाशिक जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले यामध्ये देवयानी फरांदे, सीमा हिरे, अँड राहुल ढिकले हे नाशिक शहरातून निवडणून आलेले आमदार आहेत तर जिल्हात चांदवडचे आमदार डॉ राहुल आहेर हे देखील भाजपचे आमदार आहेत तर बागलाण मतदारसंघात दीपक बोरसे हे पाचवे आमदार आहेत यामध्ये आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ राहुल आहेर या तिघांनी हॅट्रिक केली आहे. म्हणजेच सलग तीनवेळा निवडून आलेले चार आमदार आणि दुसऱ्यांदा निवडून आलेला एक आमदार भाजपकडे असताना देखील यामध्ये एकालाही मंत्रिपद न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामध्ये मंत्रिपदासाठी नाशिक शहरातून देवयानी फरांदे यांचे नाव सर्वात पुढे होते. मुख्य म्हणजे देवयानी फरांदे यांच्यापुढे नाशिक मध्य मतदारसंघात ठाकरे गटाच्या वसंत गिते यांचे तगडे आव्हान असतानादेखील त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत बाजी मारली व त्या 18 हजार मतांनी निवडून आल्या. यादरम्यान त्यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले मात्र त्या डगमगल्या नाहीत, सुरवातीच्या काळात त्यांना उमेदवारी देण्यावरून देखील घोळ घालण्यात आला मात्र त्या मागे हटल्या नाहीत आणि उमेदवारी मिळवत हिंदू-मुस्लिम संमिश्र लोकवस्तीत व कॉग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातुन निवडून आल्या तरी देखील त्यांना मंत्रिपदावर संधी मिळू शकली नाही हे विशेष .दोन आमदार असणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेला दादा भुसे यांच्या रूपाने मंत्रिपद मिळते त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री देखील केले जाते मग भाजप आमदारांच काय चुकले की त्यांना संधी मिळू नये अशी खदखद भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असताना पाच वर्षे वाट पाहून देखील भाजप आमदारांच्या पदरी उपेक्षाच पडली. त्यानंतर अडीच वर्षाच्या कार्यकाळात देखील तेच घडले आणि आता पुन्हा महायुतीची सत्ता आली असताना देखील भाजप आमदारांच्या पदरी निराशाच पडली आहे. मुख्य म्हणजे चांदवडचे आमदार डॉ राहुल आहेर यांच्या प्रचार सभेत तत्कालीन उपमुख्यमंत्री व आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्री करण्याचे जाहीर सभेत सांगितले असताना देखील त्यांना देखील संधी मिळू शकलेली नाही हे विशेष यामुळे सत्ता येऊन आणि भाजपचा मुख्यमंत्री असून देखील भाजप आमदारांना साधे राज्यमंत्रीपद देखील मिळू नये यामुळे भाजप आमदारांमध्ये नाराजी कायम असल्याचे चित्र आहे.

Loading

Previous Post

“आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना “

Next Post

माझ्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री आग्रही होते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White