मुख्यमंत्र्यांची कामकाजाला सुरवात

नाशिक : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या फाईलवर पहिली सही केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईलवर केली.पुणे येथील रुग्ण चंद्रकांत कुऱ्हाडे यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतुन देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत.चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे प्रमुख उपस्थित होते. याशिवाय, अनेक सेलिब्रिटींनीही यावेळी उपस्थिती लावली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

![]()












