भ्रष्ट्राचार करत प्लॉट,कारची खरेदी, 1 कोटी 80 लाखांची मालमत्ता जप्त

नाशिक : प्रधानमंत्री जीवनज्योती विमा व सुरक्षा विमा योजनेअंतर्गत बनावट खातेधारकांसह त्यांचे तोतया वारसदार दाखवून या योजनेअंतर्गत तब्बल 2 कोटी 12 लाख रुपये हडपणारा पंजाब नॅशनल बँकेच्या कॅनडा कॉर्नर येथील शाखेत सहायक व्यवस्थापक असणारा संशयित आरोपी दीपक कोळी(वय 40) याच्याकडे मोठी मालमत्ता आढळून आली आल्याने पोलीस देखील चक्रावले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून संशयित दीपक कोळी हा नाशिकच्या पंजाब नॅशनल बँकेच्या कॅनडा कॉर्नर येथील शाखेत दीपक कोळी हा सहायक व्यवस्थापक समकक्ष पदावर नोकरी करत होता. जे विमाधारक खातेदार मयत झाल्यावर त्यांच्या वारसदारांना विमा रकमेचा मिळवून देण्याचे काम तो पहात होता. यादरम्यान केंद्राच्या विमा योजनेअंतर्गत 436 रुपये विमा बँक खातेधारकाला वर्षाला भरायचे आहे. खातेधारक जर या दरम्यान मयत झाला तर त्याने दाखविलेल्या वारसदाराला विम्याची 2 लाख रुपयांची रक्कम मिळत असे यामुळे कोळी याने बँकेत दोनशे बनावट खाती उघडली यानंतर त्या खातेधारकांचे वारसदारसुद्धा त्याने तोतया दाखवून 106 खातेधारकांची विम्याची रक्कम हडपली मात्र यादरम्यान बॅंकेच्या या शाखेत नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने हा सगळा प्रकार उघडकीस आल्याचे समजते. जेव्हा कोळी याने बनावट खात्यांच्या खातेधारकांच्या कागदपत्रांच्या केवायसीमध्ये बदल करण्याच्या सूचना त्या नवीन कर्मचाऱ्याला केल्या, तेव्हा त्यांचा संशय वाढला आणि या घटनेचा पर्दाफाश झाला पोलिसांनी केलेल्या तपासणीत दीपक कोळी याने दोन वर्षात 12 लाखांची नवीन कार, पाथर्डी परिसरात एक भूखंड खरेदी केला होता तसेच 1 कोटी 42 लाख रुपयांच्या मुदत ठेवींच्या (एफडी)पावत्या त्याच्या राहत्या घरी मिळून आल्या. पोलिसांनी कारसह एफडी पावत्या जप्त केल्या आतापर्यंत 1 कोटी 80 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे असून त्याचे बँक खातेही गोठविण्यात आले आहे त्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे.


![]()












