वाहनांची तोडफोड व जाळपोळ

नाशिक : विडी कामगार नगर परिसरात रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास विशांत उर्फ काळू भोये (29,रा अमृतधाम) याच्या डोळ्यात मिरचीची फूड टाकत काही महिला पुरुष, व मुलांनी धारदार शस्त्राने वार करत खून केला केल्याची घटना घडली होती. या घटनेचे मोठे पडसाद परिसरात उमटले. काही संतप्त झालेल्या लोकांनी परिसरात उभ्या केलेल्या एकूण सहा वाहनांच्या काचा फोडल्या तसेच एक रिक्षा, ट्रकची जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर काही नागरिकांच्या घरांवर दगड फेकून टायर जाळण्यात आले. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी जमावाची समजूत काढत, दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली त्याचबरोबर सर्व संशयितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले यानंतर जमाव शांत झाला. खुनाच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी एकूण सात महिलांसह काही पुरुषांवर गुन्हा दाखल केला. यापैकी दोघा युवकांना आडगाव पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.

![]()












