आमदार देवयानी फरांदे यांना विश्वास, प्रचाराला जोरदार प्रतिसाद

नाशिक: हिंदुत्ववाद हा स्वाभिमान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात त्याप्रमाणे हिंदुत्व ही सर्वसमावेशक जीवनशैली आहे. त्यावर माझी अतीव श्रद्धा व निष्ठा असल्याचे प्रतिपादन भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार देवयानी फरांदे यांनी केले. मध्य नाशकात झालेल्या प्रचार फेरीदरम्यान त्या पत्रकारांशी बोलत होत्या या निवडणुकीत भरघोस मते मिळून हिंदुत्वाचा विजय निश्चितपणे होणार. असा विश्वासही प्राध्यापक देवयानी फरांदे यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व आम्ही जगतोय, ही विचारधारा शहराच्या, राज्याच्या आणि देशाच्या स्थैर्यासाठी आवश्यक आहे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदुत्ववाद ही गरज आहे काही राजकीय पक्षांना मात्र हिंदू असूनही हिंदुत्व विषयी बोलण्याची लाज वाटते. या उलट मी हिंदुत्ववादी असल्यामुळे विरोधक टीका करतात पण हिंदुत्ववाद हा माझा स्वाभिमान आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत असलेला हिंदुत्ववाद आज आमच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे आजच्या काळात देशाच्या स्थैर्यासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदुत्ववाद आवश्यक आहे. कारण विशिष्ट धर्माचे आक्रमण जागतिकीकरण आणि इतर सामाजिक आव्हाने या संदर्भात तोच प्रभावी उपाय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा कायमच उघडपणे हिंदुत्वाचा पुरस्कार करतात. नरेंद्र मोदी यांनी नाशिक मधील जाहीर भाषणात त्याचा पुनर्विचार केला आहे

![]()












