उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या काही तासाआधी महायुतीचे टेन्शन वाढले

नाशिक : आज विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना महायुती व महाविकास आघाडी मध्ये टेन्शन निर्माण झाले आहे . त्यातल्या त्यात महायुती मध्ये गोंधळाचे वातावरण असून काही दिवसांपूर्वी देवळाली मतदारसंघासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून डॉ राजश्री अहिरराव यांचा अर्ज दाखल करताना अगदी शेवटच्या क्षणी मुंबईहुन हेलिकॉप्टरने एबी फार्म पाठवण्यात आले होते. याची तक्रार देवळाली मतदारसंघातील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी च्या विद्यमान आमदार व उमेदवार सरोज आहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती मात्र उमेदवारी अर्ज माघारीसाठी काही तास शिल्लक असतानाच शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव या नॉट- रीचेबल असल्याने महायुतीचे म्हणजेच अजित पवार गटाचे टेन्शन वाढले असून राजश्री अहिरराव यांनी माघार न घेतल्यास देवळाली मतदारसंघात अजित पवार गट व शिंदे गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे म्हणजेच या ठिकाणी तिहेरी लढत बघायला मिळू शकते अशाच काहीसा प्रकार दिंडोरीत घडला असून ऐनवेळी शिंदे गटाकडून एबी फार्म दिलेले उमेदवार धनराज महाले देखील नॉट रीचेबल असल्याचे समजते

![]()











