विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना संधी मिळणार का?

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच भाजपा बरोबरच ठाकरे गट शिवसेना, शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी तर आज कॉग्रेस आणि शरद पवार गटाने उमेदवारांच्या घोषणेला सुरवात केली असून अनेक ठिकाणी तर केवळ एकाच बाजूचा उमेदवार घोषित झाल्याने प्रमुख प्रतिस्पर्धी कोण ?त्याबाबत अजूनही चित्र स्पष्ट नाही असाच काहीसा प्रकार मध्य नाशिक मतदारसंघाच्या बाबतीत घडला असून ठाकरे गटाच्या शिवसेनेने माजी आमदार वसंतराव गिते यांची उमेदवारी जाहीर करत बाजी मारली याठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला मात्र महायुतीत नेमकं काय हालचाली घडतायेत ? यावरच मध्य नाशिक मध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता वसंतराव गिते यांच्या विरोधात नेमकं भाजप कुणाला उतरवत याकडे नाशिक शहराच लक्ष लागून आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीतील बंडखोरीचे इशारे देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्कात आहेत का ? अथवा मनसे कडून कुणाला उमेदवारी दिली जाते या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली म्हणजे मतदारसंघाचा नेमका कल कुणाकडे आहे हे समजू शकते .मिळालेल्या माहितीनुसार उद्या भाजपची यादी जाहीर होणार असून यामध्ये विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना संधी मिळते का अथवा अन्य कुणाचे नाव पुढे केले जाते ते कळेलच

![]()












