विद्यमान आमदार सीमा हिरेंच्या उमेदवारीला स्वकीयांचाच विरोध

नाशिक : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर तिकीट वाटप अंतिम टप्प्यात असतानाच नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पश्चिम मतदारसंघात भाजपाचे टेन्शन वाढले असून विद्यमान आमदारांना तिकीट दिल्यास काम न करण्याचा थेट इशाराच या मातब्बर नेत्यांनी प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांना दिला . मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम मतदारसंघातील भाजपाच्या इच्छुक उमेदवारांची बैठक सातपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये घेण्यात आली होती या बैठकीला दिनकर पाटील, मा नगरसेवक मुकेश शहाणे, शशिकांत जाधव, धनंजय बेळे, कैलास आहेर, विक्रम नागरे, जगन पाटील, बाळासाहेब पाटील, स्वप्नील पाटील, दिलीप भामरे, आदी उपस्थित होते. यादरम्यान या इच्छुक उमेदवारांनी लक्ष्मण सावजी यांच्या समोर विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात तक्रारीचा पाढाच वाचला .या बैठकीत माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी आमदार सीमा हिरे यांच्या उमेदवारीला तीव्र आक्षेप घेत गेल्या 10 वर्षात आमदारांनी कुठलेही काम केले नसून नवीन उमेदवार द्यावा ही मतदारांची व पदाधिकाऱ्यांची मागणी असल्याचेही पाटील म्हणाले. गेल्या निवडणुकीत सीमा हिरे यांना मदत करत 11 हजार मते मिळून दिलीत आता पक्षाचा उमेदवार पराभूत होऊ नये याचा विचार गांभीर्याने करावा आणि निवडून येणाऱ्या उमेदवाराला तिकीट द्यावे अशीही मागणी दिनकर पाटील यांनी केली तर माजी नगरसेवक मुकेश शहाणे म्हणाले आमदारांनी कार्यकर्त्यांना न्याय दिलाच नाही त्याचबरोबर नवीन उद्योग आणणे सोडाच साधा रोजगार देखील दिला नाही त्याचबरोबर इतर इच्छुक उमेदवारांनी देखील आमदार हिरे यांच्या उमेदवारीला विरोध करत निवडून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी देण्याची मागणी केल्याने पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार सीमा हिरे यांची वाट बिकट दिसत असून आता यावर पक्ष काय निर्णय घेतो उमेदवार बदलून दिला जातो अथवा पुन्हा एकदा हिरे यांनाच उमेदवारी दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

![]()












