लाखोंचा माल आगीत जळून खाक

नाशिकरोड : परिसरातील नायगाव भागात असलेल्या फटाकेच्या गोदामाला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत पूर्ण गोडाऊन जळून भस्मसात झाले आहे. यामध्ये गोडाऊन मध्ये काम करणारा एक कामगार भाजला असून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . शिंदेगाव परिसरातील नायगाव येथे श्री स्वामी समर्थ फटाके नावाचे गोडाऊन सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिवलाल विसपुते आणि गौरव चंद्रकांत विसपुते यांच्या नावे आहे. येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपये किमतीचे फटाके या गोडाऊन मध्ये ठेवण्यात आले होते. आज दुपारच्या सुमारास काही कारणांमुळे या गोडाऊनला आग लागली.आणि क्षणांमध्ये या आगीने रोद्र रूप धारण केले.धुराचे मोठं-मोठाले लोळ लांबून दिसत होते. यादरम्यान घटनास्थळी अग्निशमन दल तात्काळ पोहचून आग विझवण्याचा प्रयन्त केला. या आगीत एक जण गंभीर भाजला असून अजूनही काही कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

![]()















