मंत्री.. पीए….आणि भ्रष्टाचार..

एकीकडे भारतात लोकसभा निवडणुकांचा बोलबाला सुरू असताना झारखंडची राजधानी असलेल्या रांची येथून खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहे. तो झारखंडचा मंत्री त्याचा पीए आणि पीए च्या घरातील लवकर असलेल्या व्यक्तीच्या घरी अंमलबजावणी संचालयाने छापा टाकला असता नोकराच्या घरात तब्बल 30 कोटी रुपये मिळून आले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे काँग्रेस पक्षाचे नेते व झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सहाय्यक संजीव लाल यांचा तो नोकर असल्याचे समजते. गेल्या वर्षी मनी लॉन्ड्री प्रकरणी अटक करण्यात आलेले झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांच्याशी संबंधित प्रकरणात हे छापे टाकण्यात आले मुख्य म्हणजे पंधरा हजार पगार असलेल्या एका साध्या नोकऱ्याच्या घरात चक्क नोटांची थप्पी पाहून ईडीचे अधिकारीही चक्रावले अखेर नोटा मोजण्यासाठी नोटा मोजण्याचे यंत्र मागविण्यात आले. त्या जप्त करण्यात आलेल्या नोटा घरात कशा पद्धतीने ठेवल्या होत्या त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. बॅग, सुटकेस ,पॉलीथीनमध्ये या नोटा ठेवण्यात आलेल्या होत्या. रांचीमध्ये ज्या नऊ ठिकाणी छापे टाकले त्यात रस्ते, बांधकाम विभागात कार्यरत सेल सिटीचे अभियंता विकास कुमार यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.

![]()











