• Latest
  • Trending
‘मैत्रीत घात’ त्या महिलेचा अपघात नसून खून

‘मैत्रीत घात’ त्या महिलेचा अपघात नसून खून

August 20, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

‘मैत्रीत घात’ त्या महिलेचा अपघात नसून खून

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

अपघाताचा बनाव करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक : वाडीवऱ्हे परिसरातील सांजेगाव येथील मिरची हॉटेल-रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या नाशिक येथील सिडको परिसरातील रूपाली पाटील ( वय 34) यांच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे प्रेमसंबंधातून झालेला खूनाचा प्रकार असल्याचे पोलिस तपासात समोर आल्याने खळबळ उडाली आहे . मिळालेल्या माहितीनुसार सिडको परिसरातील कामटवाडे भागातील शिवनारायण अपार्टमेंट मध्ये वास्तव्यास असणाऱ्या व एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कार्यरत असणार्‍या विवाहिता रूपाली पाटील व आरोपी दीपक सैंदाणे यांच्यात मागील दोन वर्षापासून मैत्रीपूर्ण संबंध होते. मुख्य म्हणजे दोघेही एका सोसायटीत आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. ते नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी फिरण्यासाठी वाडीवरे शिवारात फिरण्यास कारने गेले होते. परिसरात फिरण्याचा आनंद घेताना दीपक ने मद्यप्राशन केले यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले या वादात रूपाली पाटील यांनी दीपकला पोलीस कारवाईची धमकी दिल्याने त्याचा राग मनात धरून रूपाली पाटील जेव्हा कार खाली उतरल्या तेव्हा दीपकने हॉटेलच्या प्रवेशद्वारावर कार त्यांच्या अंगावर टाकून जागीच ठार मारल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करत मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात आणला मात्र पोलिसांचा संशय बळावल्याने दिपकला त्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दीपकची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत घडलेला प्रकार कथन केला.रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे झटापटीत रूपांतर झाले. त्यानंतर रूपाली कारमधून उतरून रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराकडे जात असताना दीपकने कार पाठीमागून वेगाने नेत त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रूपाली यांचा मृत्यू झाला. रुपाली पाटील यांच्या पश्चात पती, सात वर्षांची मुलगी आणि सासू-सासरे असा परिवार आहे. तर सैंदाणे कुटुंबीयांचा करता पुरुष गजाआड गेला आहे दिपक एका खाजगी कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक पदावर नोकरीला होता. दोघे एका सोसायटीमध्ये वास्तव्यास होते. घटनेनंतर हा प्रकार प्रथमदर्शनी अपघात असल्याचे भासत होते. मात्र, परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी दीपकला तत्काळ ताब्यात घेतले. कसून चौकशीत रूपाली आणि आपले मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading

Previous Post

त्या खुनामागे एम डी ड्रग्स विक्रीची स्पर्धा आणि वर्चस्ववाद

Next Post

नाशिकमध्ये खड्डे बुजविण्यासाठी आलेला डंपरच खड्ड्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White