खून प्रकरणात ड्रग्समाफिया अर्जुन पिवाल याच्यासह दहा संशयित ताब्यात

नाशिक : नाशिकरोड परिसरातील जुन्या बिटको रुग्णालयाशेजारी गोसावी वाडीच्या मुख्य चौकात एका पान टपरीवर उभा असलेल्या सुमित अरुण पगारे(32, रा. पगारे चाळ) याच्यावर दुचाकीने आलेल्या दोघांपैकी एकाने रविवारी सायंकाळी गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या त्याच्या पोटात शिरल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यास तातडीने जवळच्या रुग्णाला दाखल केले असता तेथे उपचार सुरू असताना काही वेळेतच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या खून प्रकरणात नाशिक रोड पोलिसांनी एकूण 14 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी ड्रग्स माफिया अर्जुन पीवाल याच्यासह दहा संशयित आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिघा फरारी आरोपींचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सुमित अरुण पगारे, सुमित श्याम भाटिया, आकाश बोर्डे हे पानपट्टी जवळ पान मसाला खरेदी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी वर्चस्ववादातून संशयित अर्जुन सुरेश पिवाल, शिवा सुरेश पिवाल,मन्ना भरत गांगुर्डे, राजीक शेख, राहुल सोनवणे, निशांत भारती, शाहिद शेख, आयुष भारती, अक्षय गोसावी, राजवीर गांगुर्डे, आशिष पिवळ, साद पठाण, अमोल वाघ, पराग मिलिंद कुलकर्णी, हे सुमित पगारे व इतरांवर धावून आले. त्यांनी शिवीगाळ करत राजिक शेख याने सुमित पगारे यास आपल्यात काय असेल ते मिटवून टाकू असे बोलून हातात हात मिळविण्याच्या बहाण्याने राजीक याने त्याच्या कमरेला लावलेली बंदूक काढून सुमितच्या पोटावर दोन गोळ्या झाडल्या यामध्ये सुमित हा जागीच कोसळल्यानंतर संशयित आरोपी हे लागली दुचाकी वर पळून गेले. सुमितला तातडीने रुग्णाला उपचारासाठी नेले असता त्याची प्राणज्योत मालवली. या दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक व युनिट दोनच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणाहून 11 संशोधना ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे खुनामागे ड्रग्स विक्रीची स्पर्धा वर्चस्ववादावरून सुमितची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले असले तरी त्याच्यासोबत बळकवलेली जागा, वडिलांकडून घेतलेले उसनवारीचे पैसे परत दिले नाही व तसेच एमडी ड्रग्स विक्रीची स्पर्धा असे कारणे खुणा मागे असल्याच समोर येत आहे. यानुसार पोलिसांकडून संशयित आरोपींची धरपकड केली जात आहे त्याचबरोबर 18 ऑक्टोंबर 2023 साली सोलापुरातून थेट नाशिकला एमडी ड्रग्स सप्लाय केल्या प्रकरणी मास्टरमाइंड सनी पगारे, अर्जुन पिवळ व सुमित पगारे या तिघांना अटक केली होती. काही महिन्यांपूर्वी सुमित कारागृहातून जामीनावर सुटला होता. असे पोलिसांनी सांगितले आठवडाभऱ्यापूर्वीच सुमितच्या वाहन खरेदी-विक्रीच्या दुकानावर शशास्त्राचा धाक दाखवून संशयित आरोपींनी खंडणीसाठी धमकावले होते. यानंतर सुमितने फिर्याद दिल्याने नाशिक रोड पोलिसांनी संशयित राहुल सोनवणे यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता

![]()












