• Latest
  • Trending
नाशिक पुन्हा हादरले ! आर्थिक विवंचनेतून पतीने केली पत्नी व मुलाची हत्या

नाशिक पुन्हा हादरले ! आर्थिक विवंचनेतून पतीने केली पत्नी व मुलाची हत्या

July 21, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिक पुन्हा हादरले ! आर्थिक विवंचनेतून पतीने केली पत्नी व मुलाची हत्या

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

देवा मी तुझ्या सेवेसाठी येत आहोत म्हणत केला घात

नाशिक  :  जेलरोड भागातील गोकुळनगर परिसर सोमवारच्या दुहेरी हत्येच्या घटनेने हादरले. आर्थिक प्रॉब्लेममध्ये असलेल्या कुटुंबातील पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नी आणि सात वर्षाच्या मुलावर घरगुती चॉपरने वार करत त्यांची हत्या केल्यानंतर स्वताच्या हाताची नस कापून  विषारी औषध सेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार मूळ जळगाव येथील रहिवाशी किरण एकनाथ हजारे(वय54) हा पत्नी अश्विनी(43) आणि मुलगा सुयश(7) यांच्यासह चाळीतील एका छोट्याशा खोलीत राहत होता. सोलर उपकरणे आणि रुग्णालयांसाठी ऑक्सिजन सिलेंडरच्या मार्केटिंगचे काम करणारा किरण गेल्या दोन महिन्यांपासून नैराश्यमध्ये होता. किरण हजारेचे 2017 मध्ये अश्विनी सोबत लग्न झाले होते. अश्विनी हिचे  हे दुसरे लग्न असून तिला पहिल्या पतीपासून अठरा वर्षाचा मुलगा आहे.तो अश्विनीच्या आईकडे राहतो. अश्विनीचे जेलरोडलाच माहेर आहे. गरीबी असल्याने लग्नापूर्वी काम करून साठवलेले पैसे ही लग्नानंतर खर्च झाले. व्यवसायात उत्पन्न मिळत नव्हते. त्याचबरोबर जळगावला होतो तोपर्यंत चांगली परिस्थिती होती.  लग्न नव्हते करायला पाहिजे असे किरणने पोलिसांना सांगितले. रात्री सोबत झोपले आणि घात झाला घटनेच्या दिवशी सायंकाळी कामावरून येताना दुकानातून घरगुती कामासाठी लागणारा  चोपर सोबत आणला होता. किरणने रात्री पत्नी व मुलांसोबत जेवण केले आणि त्यांना भरभरून पाहिले ते गाठ झोपी गेले आणि पहाटे त्यांच्या डोक्यावरून हात फिरविला देवाला प्रार्थना केली आणि म्हणालो देवा आम्ही तिघे तुझ्या सेवेसाठी येत आहोत असे म्हणत पत्नीच्या गळ्यावर वार केले. तिच्या आवाजाने लहानसा मुलगा उठला आणि त्याला एका हाताने पकडून किरणने त्याच्या गळ्यावरही वार केले. त्यानंतर दोघांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर त्याने स्वतःवरही वार करून विष प्राशन केले. मात्र माझ्यावरच वार करून मी जिवंत राहिलो असा थरारक प्रसंग निरागस मुलगा व पत्नीला  ठार मारणाऱ्या किरण हजारे यांनी पोलिसांसमोर कथन केला. खिडकी अर्धवट उघडी ठेवल्याने आजूबाजूच्यांना कळाले ….सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे दिवस उजाडल्यानंतर किरण याच्या घराच्या मुख्य दरवाजा बंदच होता. तर बाजूची खिडकी अर्धवट उघडी होती. दुपारी आजूबाजूच्या रहिवाशांनी खिडकीतून बघितले असता जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात तिघेजण निपचित पडल्याचे दिसल्यानंतर त्यांनी चाळ मालकाला कळवले. मालकाने तातडीने धाव घेऊन बघितल्यानंतर 112 वर कॉल केला. नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे पोलीस कर्मचारी विशाल पाटील, अरुण गाडेकर, विशाल कुवर, समाधान वाजे, आदींनी घटनास्थळी धाव घेतली असता मुख्य दरवाजाला आतून वरची कडी लावलेली होती. आत जाताच किरण याची थोडीशी हालचाल सुरू असल्याने पोलिसांनी लागलीस त्याला उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले. किरण हा निर्व्यसनी व धार्मिक वृत्तीचा असल्याचे तपासात पुढे आले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात  शोककळा पसरली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात आश्विनी व मुलगा सुयश यांचे               शवविच्छेदन करण्यात आले. जखमी किरण हजारे याच्यावर नाशिक रोडच्या बिटको रूग्णालयात  उपचार सुरू आहेत. त्याच्यावर पत्नी व मुलाच्या खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

Previous Post

“अशोकामार्ग” परिसरात एसटी बस झाडावर आदळली

Next Post

कुंभमेळा निमित्ताने राजकीय नेते,अधिकारी यांना चाप लावण्याची तयारी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White