
नाशिक : उंटवाडी येथील एका उच्चभ्रू निवासी प्रकल्पातील अनेक सदनिका नागपूरच्या एका वस्तीगृह व्यवस्थापन कंपनीला भाडेतत्त्वावर करार करून देण्यात आले आहेत. या सदनिकांचा वसतीगृहासाठी होणारा वापर लँड जिहाद असून त्याचा वापर स्थानिक नागरिकांसाठी त्रासदायक असल्याचा आरोप करत नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले. उंटवाडी भागात बांधकाम व्यावसायिकाने नागपूरच्या एका कंपनीला काही सदनिका भाडेतत्त्वावर वापरण्यासाठी दिल्या होत्या. या सदनिकांचा वापर अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी होणार होता. सर्वसामान्य रहिवाशांच्या मध्यवस्तीत या मुलांना सदनिका देण्याचा घाट एक प्रकारे लँड जिहाद असल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी केला या अशा प्रकारामुळे परिसरातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करीत निवासी प्रकल्पात व्यावसायिक होस्टेल कसे काय? आणि गरिबांच्या घरात वस्तीगृह का ? असा प्रश्न उपस्थित करीत या विरोधात स्थानिक नागरिकांसह आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी ही करण्यात आली स्थानिक नागरिकांनी यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना निवेदनही दिले अशाप्रकारे कोणालाही जागा भाड्याने दिलेली नाही या प्रकरणावर बांधकाम व्यवसायिक शहा यांनी आपली बाजू मांडत सेंटर पार्क हा निवासी प्रकल्प आणि सदनिका धारक माझ्या कुटुंबाप्रमाणे आहेत. या ठिकाणी श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. यामुळे या ठिकाणी असा कुठलाही गैरप्रकार केलेला नाही याबाबत अफवा पसरली जात आहे. या गोष्टीची आमचा कुठलाही संबंध नाही. अशा प्रकारे कोणालाही जागा भाड्याने दिलेली नाही. आम्ही केवळ स्वातंत्र्य सदनिका विकण्याला प्राधान्य देणार आहोत.

![]()












