राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

नाशिक : शहरातील तीन दिग्गज नेत्यांवर एकाच दिवशी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.यात माजी महापौरांसह, विद्यमान गटनेते आणि माजी नगरसेवकाचा समावेश आहे. माजी महापौरांवर गुन्हा दाखल नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यातगंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते योगेश दाभाडे(47 रा तारवाला नगर) यांनी मुर्तडक यांच्याकडून सुमारे वर्षभरापूर्वी माजी महापौर मुतडक यांच्याकडून ९० लाख रुपये हातउसने घेतले होते. दाभाडे यांच्या म्हणण्यानुसार, व्याजासह पैसे परत करूनही मुर्तडक यांनी त्यांच्या घरात घुसून कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ केली आणि त्यांना बेदम मारहाण केली. “तू मेलास तरी तुझ्या स्मशानातून पैसे काढेल,” अशी भीषण धमकी मुर्तडक यांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून योगेश दाभाडे यांनी फिनाईल पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात हलविण्याचे कळते. याप्रकरणी पोलिसांनी मुर्तडक यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, मुर्तडक हे मनसेच्या सत्ताकाळात महापौर होते. आता अशोक मुतडक हे देखील शिंदे गटाच्या शिवसेनेत आहेत. महापालिका गटनेते देखील वादात दुसऱ्या घटनेत, ठाकरे गटाच्या शिवसेनेचे महापालिका गटनेते केशव पोरजे यांच्यासह तीन जणांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय भवानी रोड जाचक मळा या परिसरात राहणारे अनिल कुमार बारी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की वडनेर केंद्रीय विद्यालयासमोर महादेव मंदिर मागे शेती सर्वे नंबर 249/1 मध्ये क्षेत्र नसतानाही बारी यांना त्या क्षेत्रातील दोन गुंठे क्षेत्र विकून त्यांची आर्थिक फसवणूक केली. माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल उपनगर परिसरात शेत जमिनीच्या वादातून जीवघेणा हल्ला व पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केल्याची गंभीर घटना घडली या प्रकरणी सुरेश रंगा बोराडे 55 राहणार पिंपळगाव खांब यांच्या फिर्यादीवरून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी पांडुरंग चुंबळे व त्यांच्या सहा ते सात साथीदारांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 एप्रिल रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास आरोपी हे बोराडे यांच्या शेतात जबरदस्तीने घुसले त्यांनी बोराडे यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी तो चुकवला त्यानंतर आरोपींनी त्यांना शेतातून पळून लावले तसेच त्यांच्या पुतण्या योगेश बोराडे यालाही जीवे मारण्याची धमकी देत हुसकून लावण्यात आले. फिर्यादी विरोध करत असल्याचे पाहून आरोपींनी शेतातील फ्लॉवर पिकांवर नांगर फिरून मोठे नुकसान केले. राजकीय वर्तुळात मोठी खळबळ एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये बड्या नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

![]()












