• Latest
  • Trending
कोयत्याने तरुणावर वार करणारी महिला ताब्यात

कोयत्याने तरुणावर वार करणारी महिला ताब्यात

April 16, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

कोयत्याने तरुणावर वार करणारी महिला ताब्यात

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

मनाचा थरकाप उडवून देणाऱ्या या व्हिडिओने शहरात खळबळ

नाशिक  : विल्होळी शिवारात सोमवारी (दि 13)मुंबई आग्रा महामार्ग लगत एका दाम्पत्याने कंपनी कामगार असलेल्या सुरज कुमार मोहनलाल सोळंके(वय  40) याच्यावर प्राण घातक हल्ला चढविला होता. हल्ला चढवितानाचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरून एका संशयित दांपत्याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठहर मै आता……इतना क्या काम है…… सुबह से परेशान करके रखा है…..असे म्हणत सुरज मोहनलाल सोलंकी (वय 40) हा युवक घराबाहेर पडला. या दरम्यान नासिक पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील विल्लोळी शिवारात कटारिया कंपनीसमोर एका महिलेने सोळंकी याच्या मानेवर डोक्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यापूर्वी या महिलेसह एकाने गंभीर जखमी असलेल्या सोलंकी याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. त्यामुळे तो अस्वस्थ झाला आणि खाली कोसळला याचा फायदा घेत महिलेने त्याच्यावर वार केले तेव्हा तेथे काळ्या रंगाचा शर्ट घातलेला तरुण वार करीत असताना उघड्या डोळ्यांनी पाहत होता. या घटनेचा थरकाप उडविणारा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्याने खुनाची चर्चा वाऱ्यासारखी नाशकात पसरली. मुख्य म्हणजे त्यावेळी त्या महिलेचा पती सुद्धा घटनास्थळी उभा राहून हा सगळा प्रकार बघत असल्याचे व्हायरल व्हिडिओतून समोर आले होते. मानवी मनाचा थरकाप उडून देणाऱ्या या व्हिडिओने शहरात एकच खळबळ उडाली होती. नाशिक शहराच्या वेशीवर भरदिवसा अशा प्रकारे कोयत्याने एखाद्या व्यक्तीला महिले कडून ठार मारण्याचा प्रयत्न धक्कादायक होता. हल्ल्यानंतर पती आणि पत्नी  दुचाकीने पसार झाले होते गुन्ह्यात वापरलेला कोयताही त्यांनी घटनास्थळाहून उचलून सोबत नेल्याचे व्हिडिओत दिसते. या प्रकरणी तालुका पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अज्ञात महिला व पुरुषावर दाखल केला. यानंतर तपासाला वेग देण्यात आला संशयित महिला व तिच्या पतीला ग्रामीण पोलिसांनी अहिल्या नगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील गावातून ताब्यात घेतल्याचे समजते त्याची मृत्यू बरोबर झुंज सुरू– या हल्ल्यात सोलंकी हा गंभीर जखमी झाला असून जिल्हा रुग्णाला त्याची मृत्यूची झुंज सुरू आहे. सोलंकी याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले  सोलंकी नाशकात कसा आला ? सोलंकी याला मधुमेह असून त्याच्या पायाला गंभीर इजा झाल्याने पुढच्या दोन दिवसांनी पायावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. सुरज हा मूळचा अहमदाबादचा रहिवाशी असून सध्या तो नाशिकमध्ये स्थायिक होता. द्वारका जवळील ट्रॅक्टर हाऊस जवळील घर बदलून तो व त्याची वहिनी नानावली जुने नाशिक येथे राहण्यास आले होते. तो वाडीवरे येथील पेलीकन कंपनीत कार्यरत होता. मागील काही काळापासून तो घरीच होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरज कुमार फोनवर कोणाशी तरी वाद घालत रागाच्या भरात घराबाहेर पडला. त्यावेळी त्याची वहिनी मेघा सोलंकी यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकून न घेता निघून गेला सुमारे तासाभराने त्याचे दोन्ही मोबाईल बंद आढळले.

https://youtube.com/shorts/E2Y7gYxjz_I?si=JEosbi_steQxYsN1

Loading

Previous Post

नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

Next Post

नाशकात एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White