• Latest
  • Trending
नाशिकमध्ये महापौर पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू, बडे नेते  महाजनांच्या भेटीला

नाशिकमध्ये महापौर पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू, बडे नेते महाजनांच्या भेटीला

January 22, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकमध्ये महापौर पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू, बडे नेते महाजनांच्या भेटीला

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण जाहीर होताच शहराचे राजकारण तापले असून पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर बहुमत मिळालेल्या भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली असून, महापौर पदासाठी व इतरही प्रमुख पदांसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 50 टक्के महिला आरक्षणाच्या नियमानुसार यंदा राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला महापौर असणार असून 14 महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला संधी मिळाली आहे. या सोडतीत नाशिक महापालिकेचे महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सत्ता मिळवलेल्या भाजपमध्ये महापौरपदासाठी स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.नाशिकमध्ये महापौरपदासाठी हिमगौरी आडके यांचे नाव सध्या सर्वाधिक प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे. त्यांनी याआधी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यांचे बंधू राहुल आहेर हे चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, आहेर कुटुंब हे भाजपशी एकनिष्ठ राहिलेले आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुसंस्कृत, अभ्यासू आणि प्रशासकीय अनुभव असलेला चेहरा महापौरपदी देण्याकडे भाजपचा कल असल्याने हिमगौरी आडके यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे.महापौर आरक्षण सोडतीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेत आयुक्तांची भेट घेतली आहे. महापौरपदाच्या प्रबळ दावेदार हिमगौरी आडके यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. तर गणेश गीते, सुधाकर बडगुजर, सुरेश पाटील हे देखील महत्त्वाच्या पदांसाठी महाजनांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचे चित्र होते. मंत्री गिरीश महाजन यांनी सुधाकर बडगुजर यांच्या म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या कार्यालयालाही भेट दिली असून नाशिक महापालिकेतील इतर प्रमुख पदांसाठी नगरसेवकांकडून जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे चित्र आहे.

Loading

Previous Post

प्रभाग क्रमांक 23 भाजपच्या बालेकिल्ल्यात आता ठाकरे गटाची लढाई

Next Post

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White