गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस “ऍक्शन मोड” मध्ये

नाशिक : शहरातील गुन्हेगारी वाढत असून यामध्ये भाईगिरी, खून यासारख्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश वाढू लागल्याने सामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त केली असताना पोलीस देखील आता ऍक्शन मोड वर आले असून पोलिसांनी गुन्हेगारी व्यक्ती अथवा तिला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईचा दंडा उगारला आहे. अंबडच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी महेश सोनवणे उर्फ चिमण्या हा कारागृहातुन बाहेर आल्यानंतर त्याच्या स्वयंघोषित समर्थकांनी एकच जल्लोष करून त्याच्या गळ्यात पुष्पहार घालून खांद्यावर बसवत त्याची मिरवणूक काढली.यादरम्यान टोळक्याने अन्य वाहनधारकांना मज्जाव केला. काहींच्या अंगावर ते धावून गेल्याची चर्चा आहे. त्या उत्साही गॅंगने मोठ्या उत्साहात आपल्या बॉसला मिरवणे मात्र त्याच्या समर्थकाना भोवले असून त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच. ते 22 जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन चित्रफितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू करून 22 जणांना ताब्यात घेत त्यांची नाशिकरोड परिसरातुन पोलिसांनी त्यांची धिंड काढली. यामध्ये पाच जण अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुख्य म्हणजे व्हायरल व्हिडीओ हा पोलिसांना आवाहन देणारा तर होताच त्याचबरोबर खुनाचा बदला घेतल्याचा जल्लोष ते तरुण करत होते. यामध्ये काही तरुणांकडे धारदार शस्त्रे देखील होते. यामुळे गुन्हेगारी वृत्तीला प्रोत्साहन मिळणारे कुठलेही कृत्य पोलीस खपवून घेणार नाही असेच पोलीस दलाच्या कामगिरी वरून दिसून येत असल्याने नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार सातपूर परिसरात तरुणाचा किरकोळ कारणावरून खून करणाऱ्या टोळक्याची देखील परिसरातून धिंड काढली आहे यामध्ये देखील अल्पवयीन मुले असल्याचे समजते.


![]()












