अंबड परिसरातील श्री ज्वेलर्सवर टाकला होता दरोडा

नाशिक : अंबड परिसरातील श्री ज्वेलर्स या सराफी पेढीवर बंदुकीचा धाक दाखवत भरदिवसा दरोडा टाकणाऱ्या तिघांपैकी एकाला गजाआड करण्यात गुन्हे शाखा युनिट – 1 च्या पथकाला यश मिळाले असून त्या संशयितांच्या ताब्यातुन साडे चार तोळे सोने व साडे सहा तोळे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भरदिवसा दरोडा पडल्यानंतर नागरिकांमध्ये भीती पसरली असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दोन तपास पथके तयार करून दरोडेखोरांचा माग काढण्यास सुरवात केली होती. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाने सिन्नरफाटा परिसरात सापळा रचत निलेश उर्फ शुभम बेलदार (25,रा दत्तनगर, चुंचाळे) यास ताब्यात घेतले या तीन संशयितांपैकी निलेश बेलदार याने परिसराची रेकी करत दोघांना दुकानापासून काही मीटर अंतरावर उतरविले आणि स्वतः दुचाकी घेऊन पुढे जाऊन उभा राहिला होता .लूट होताच तिघेही संशयित फरार झाले मुख्य म्हणजे निलेश बेलदार याच्यावर सातपूर परिसरात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे पोलीस त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. ही कामगिरी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, महेश साळुंखे, विशाल काठे, मुख्तार शेख, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, विशाल देवरे यांच्या पथकाने केली

![]()












