• Latest
  • Trending
आमदाराच्या बॉडिगार्डची  “दादागिरी”

आमदाराच्या बॉडिगार्डची “दादागिरी”

January 12, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

आमदाराच्या बॉडिगार्डची “दादागिरी”

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

व्हॉटेलच्या वेटरवर रोखली पिस्तुल, पोलीस अंमलदाराला अटक

नाशिक : एकीकडे राजकीय नेत्यांनी पोसलेले गुंड कशी दादागिरी करतात याचे महाराष्ट्रातील बीड प्रकरण ताजे असतानाच नाशिक शहरात सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या बॉडिगार्डने म्हणजेच अंगरक्षकाने कर्तव्यावर असताना हॉटेलमधील वेटरवर अगदी किरकोळ कारणातून रिव्हॉल्व्हर रोखल्याने खळबळ उडाली आहे.त्यास अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकरोड रेल्वे स्थानक जवळ असणाऱ्या हॉटेल रामकृष्ण येथे ग्रामीण पोलीस मुख्यालयातील अंमलदार व आमदार सुहास कांदे यांचे बॉडिगार्ड (अंगरक्षक)असलेले विशाल झगडे(1356) हे जेवणासाठी गुरुवारी (दि 9)रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गेले असताना हॉटेल व्यवस्थापक सागर पाटील यांच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या सिराण शेख याने झगडे यांना ऑर्डर घेताना पोळी नसल्याचे सांगितले त्यावरून झगडे आणि त्यांच्या बरोबर असलेल्या दोघांनी वाद घालत दमबाजी केली. यादरम्यान हातावर “पोलीस” अक्षर गोदविलेल्या संशयित इसमाने कंबरेला असलेली पिस्तूल काढून वेटर असलेल्या शेखवर रोखत मला पोळी पाहिजे, तू तिकडे काहीही कर… असा दम भरला ही माहिती हॉटेल मालक विनोद भगत यांना कळवण्यात आली.

यावेळी अन्य वेटर असलेल्या लोकांनीही काही दिवसांपूर्वी याच व्यक्तीने किरकोळ कारणावरून हॉटेलमध्ये वाद घातल्याची माहिती दिली. यादरम्यान संबधित व्यक्तीची माहिती घेतली असता बंदूक रोखणारा संशयित हा नाशिक पोलीस ग्रामीण मुख्यालयातील कर्मचारी असून आमदार सुहास कांदे यांचा अंगरक्षक(बॉडीगार्ड) विशाल झगडे असल्याची माहिती समजली. पाटील व शेख यांच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 352,351 व शस्त्र अधिनियमांतर्गत झगडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेटरवर झगडे यांनी रोखलेली सर्विस रिव्हॉल्व्हर पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे तसेच झगडे यास अटक करून नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात आली न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत त्यांना जामीन मंजूर केला अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून झगडे यांचीही वर्तणूक पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी असून त्यांचे निलंबन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Loading

Previous Post

“त्यांच्यावर” कडक कारवाई करा, विधानपरिषद उपसभापती

Next Post

भीषण अपघाताने नाशिक हादरले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White