आज मध्य व पश्चिम चा तिढा सुटण्याची शक्यता

नाशिक : महाविकास आघाडीकडून नाशिक मध्य मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार असलेले वसंतराव गिते आणि पश्चिम मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार सुधाकर बडगुजर यांना आज तातडीने मातोश्री वर बोलावून घेण्यात आले असून त्यांना ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून ए बी फॉर्म देण्यात येणार आहे मात्र कॉग्रेसच्या सूत्रानुसार अजूनही या दोन्ही जागांचा अद्यापही निर्णय झाला नसून आज यावर चर्चा होणार असल्याचे समजते. महाविकास आघाडीत मध्य आणि पश्चिम मतदारसंघासाठी तिन्ही मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शरद पवार गट, ठाकरे गट आणि कॉग्रेस हे मध्य मतदारसंघासाठी आडून बसले आहेत मात्र तरी देखील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणतात की मध्य आणि पश्चिम मतदारसंघ ठाकरे गटाला सुटले आहेत तर कॉग्रेसच्या पक्षाच्या प्रवक्त्या डॉ हेमलता पाटील यांनी पक्षनेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार अजूनही नाशिकमधील या दोन्ही जागांचा निर्णय झाला नसल्याचे सांगितले यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असून आज मध्य आणि पश्चिमचा तिढा सुटण्याची शक्यता आहे .मात्र ठाकरे गटाची शिवसेना व कॉग्रेस या जागांसाठी अडून बसली तर दोन्ही पक्षांकडून उमेदवार उतरून मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे, तर मध्य किंवा पश्चिम एक -एक मतदारसंघ हा कॉग्रेस व ठाकरे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता राजकीय धुरीण व्यक्त करत आहेत.

![]()












