
भाजपाचे जेष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेताच देशभरात नागरिकांनी व कार्यकर्त्यानी फटाके फोडून आनंद साजरा केला. यादरम्यान एनडीएच्या अनेक खासदारांनी शपथ घेतली. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात हा शपथविधी सोहळा पार पडला. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली. एडीएतील घटक पक्षांसह देशभरातील खासदार,बॉलिवूड सेलिब्रिटी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.

मोदींच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील कोण कोण ? नागपूर लोकसभा मतदारसंघातुन निवडून आलेले भाजपाचे नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली.मुंबई उत्तरचे उमेदवार भाजपाचे पियुष गोयल यांनी पुन्हा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली.शिंदे गटाचे बुलडाणा लोकसभेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या रक्षा खडसे यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी
केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.

![]()











