26 कोटींची रोकड,90 कोटींचे बेहिशेबी दस्ताऐवज

नाशिक : शहरातील कॅनडा कॉर्नर भागात सुराणा ज्वेलर्स हे दुकान आहे मात्र काल अचानक आयकर विभागाच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकल्याने शहरात खळबळ उडाली होती. मुख्य म्हणजे याच फर्मच्या मालकांचा बांधकाम व्यवसायदेखील असल्याचे कळते. मात्र आज मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाच्या छापेमारीत मोठे घबाड मिळून आल्याने आयकर विभागाचे पथक देखील चक्रावून गेल्याचे समजते. या छापेमारीत तब्बल 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील इतर व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले असून आयकर विभागाचे टाकलेला छाप्यात 30 तास तपासणी केली यामध्ये 50 ते 55 अधिकाऱ्यांचा समावेश होता ,या पथकात नाशिक, नागपूर, जळगाव येथील अधिकाऱ्यांचा समावेश असून सुराणा ज्वेलर्स यांच्या राका कॉलनी परिसरातील आलिशान बंगल्याची देखील तपासणी करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे मनमाड, नांदगाव येथील त्यांच्या कुटूंबातील सदस्य असलेल्यांची चौकशी करण्यात आली असून ही रोकड फर्निचरमध्ये लपवून ठेवल्याची माहिती समोर येत आहे.


![]()











