
नाशिक : (ब्लॅक अँड व्हाईट वृत्तसेवा) मराठीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. गोव्यात त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.नाना पाटेकर यांना 8 ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार ते गोव्यात होते. पहाटे 5.22 वाजता त्यांना तीव्र हृदय विकाराचा झटका आला. त्यांना गोव्यातील रुग्णालयात लगेचच भरती केले. डॉक्टरांनी त्यांना 45 मिनिटं सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण काळाने घाला घातलाच… 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर यांची कारकीर्द
नाना पाटेकर यांची गणना चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये केली जाते. नाना पाटेकर यांचे पूर्ण नाव विश्वनाथ पाटेकर असे होते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 मध्ये झाला. त्यांनी 1978 मध्ये ‘गमन’ या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले, परंतु 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंकुश’ या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये काम केले आहे. ‘परिंदा’, ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’ आणि ‘खामोशी’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी गंभीर भूमिकांपासून ते विनोदी आणि खलनायकी अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘परिंदा’ मधील गँगस्टरच्या भूमिकेने सुपरहिट केले. त्यानंतर ‘प्रहार’, ‘तिरंगा’ व ‘क्रांतिवीर’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपली ‘ॲक्शन-ओरिएंटेड’ अभिनेता म्हणून छाप पाडली. ते शेवटचे हाऊसफुल 5 मध्ये दिसले होते. नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच अवघा महाराष्ट्र हळहळला. त्यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर हे गोव्याच्या दिशेने रवाना झाले. संध्याकाळपर्यंत त्यांचे पार्थिव पुण्यातील निवासस्थानी आणण्यात येईल, असा अंदाज आहे.

![]()












