• Latest
  • Trending
बहिणीला प्रपोज केल्याचा संशय आणि तरुणाचा खून

नाशिक जिल्हा गावगुंडांचा बालेकिल्ला ?

September 24, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिक जिल्हा गावगुंडांचा बालेकिल्ला ?

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

निवडणूक संपल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा भाईगिरी सुरू

नाशिक : निवडणुकीच्या काळात नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा आवाज जोरात घुमत होता. मात्र निवडणुका संपल्या आणि कायद्याच्या बालेकिल्ल्यात गावगुंडांचा जोर वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. याला कारणही तसेच आहे.काही दिवसांपूर्वी इंदिरानगर परिसरात भर दिवसा भर दुपारी एका तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत बळजबरीने कार मध्ये डांबून अपहरणाचा प्रयत्न केला जात असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला आणि परिसरात एकच खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कलानगर या वर्दळीच्या ठिकाणी भर गर्दीत एका तरुणावर कारमधून आलेल्या टोळक्याने जोरदार हल्ला चढविला. यावेळी तरुणांनी आरडा ओरड केल्याने रस्त्यावरील धाडसी महिलेसह काही नागरिकांनी धाव घेत त्याला हल्लेखोर टोळक्याच्या तावडीतून सोडविले होते. या मारहाणीत फिर्यादी शुभम कनोजिया ( 19 रा भैय्यावाडी कलानगर) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असून एका मागील गुन्ह्याच्या प्रकरणात शुभमने संशयित तन्मय कोपरे याचे नाव घेतल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचे तपासातून पुढे आले आहे. शुभम हा कलानगर परिसरातून पायी जात असताना कारमधून आलेले संशयित तन्मय कोपरे त्याचा भाऊ वडील तसेच अन्य तीन ते चार साथीदारांचा हल्लेखोर टोळक्यात समावेश होता असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शुभम हा सध्या शिक्षण घेत आहे त्याच्या वडिलांना लॉन्ड्री व्यवसाय हातभार लावतो. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र या प्रकारामुळे इंदिरानगर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. तर दुसरी घटना त्र्यंबकेश्वर येथे घडली यामध्ये या गावगुंडांचा फटका चक्क नाशिकचे माजी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, सहाय्यक आयुक्त विठ्ठल सोनवणे, सह्याद्री संमेलने ट्रेकर्स संस्थेचे प्रमुख संजय अमृतकर यांच्याबरोबर असलेले इतर डॉक्टर व आर्किटेक्ट यांना बसल्याने खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातून सह्याद्री मित्र संमेलन संस्थेच्या वतीने आंबा डोंगरावरील ट्रेक आयोजित करण्यात आली होती. यासाठी रविवारी सकाळी सुमारे 15 20 ट्रेकर्सच्या ग्रुपने त्रंबकेश्वरच्या दिशेने ट्रॅव्हलर मिनी बस मधून प्रवास सुरू केला. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आंबे गावाकडे जाताना त्यांच्या बसचा दुचाकीने दोघांनी पाठलाग सुरू केला वाटेत बस रोकल्यानंतर त्यांनी चालकाला शिवीगाळ करत बळजबरीने खाली ओढण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी त्यांना बसमधील काही ट्रेकर्स महिला, पुरुषांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणाचेही न ऐकता दुचाकीला कटका मारला. हप्त्यांनी गाडी घेतलेली आहे. नुकसान झाले ते भरून द्या असे सांगून भांडण करण्यास सुरुवात केली. मुळात दुचाकी ला कुठलाही धक्का लागलेला नव्हता किंवा नुकसान सुद्धा झालेले नव्हते असा दावा ट्रेकर्स करून करण्यात आला. त्यावेळी दुचाकी चोराने फोन करून त्यांच्या आणखी चार साथीदारांना बोलावून घेतले आणि चालकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सह्याद्रीचे संजय अमृतकर यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पैसे घेतल्याशिवाय जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला याप्रकरणी चालक सिद्धार्थ रणशूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संजय रामू भूतांबरे, अनिल रामू भूतांबरे, विशाल रामू भूतांबरे,शंकर सुरेश भूतांबरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे लक्षात येताच गावगुंड पळाले. बस मध्ये मोठ्या सरकारी पदावरील नाशिकचे अधिकारी असल्याचे गाव गुंडांच्या लक्षात आले आणि सर्व स्ट्रेकर्स हे नाशिकचे असल्याचे समजल्यावर हल्लेखोर गाव गुंडांनी दुचाकीने घटनास्थळवून पलायन केले. त्र्यंबकेश्वर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात शोध घेऊन तिघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात जमा केली होती. मोडस ऑफरेंडी असल्याचा संशय पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करायचा आणि दुचाकीला कट वगैरे मारला चालकांनी शिवी दिली अशी काहीतरी कारण सांगून कुरापत काढून मारहाण करत पैसे उकळायचे अशा प्रकारचे गावगुंडांची मोडस ऑपरेंडी असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी देखील याच परिसरात अशीच घटना घडली होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत नासिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आधी पर्यटकांचा राबता असलेल्या तालुक्याचा परिसर सुरक्षित करण्याची मागणी होत आहे.

Loading

Previous Post

नाशकात टेंडर होर्डिंग ठेकेदार तुपाशी तर भूमिपुत्र उपाशी

Next Post

नाशकात विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांविरोधात घोषणाबाजी आणि ठिय्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White