• Latest
  • Trending
अवजड वाहनामुळे निष्पाप तरुणाचा गेला जीव

अवजड वाहनामुळे निष्पाप तरुणाचा गेला जीव

September 1, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

अवजड वाहनामुळे निष्पाप तरुणाचा गेला जीव

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

इंदिरानगर, डीजीपी नगर, वडाळा रोड भागात भरदिवसा धावतात ट्रक कंटेनर

नाशिक : आंबेडकरनगर समोरील सावता माळी कॅनॉल रस्त्याने इंदिरानगर कडे दुचाकीने प्रवास करणाऱ्या युवकाला पाठीमागून भरधाव आलेल्या अवजड ट्रकने धडक दिल्याने या धडकेत दुचाकी चालक आदित्य प्रकाश दुसाने(35,रा प्रगती सोसायटी इंदिरानगर)हा गंभीरित्या जखमी झाला होता. त्यास नागरिकांनी जवळच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुसाने हा त्याच्या दुचाकीने टीजेपी नगर -1 मधून वडाळा गावच्या दिशेने घराकडे जात होता. यावेळी पाठीमागून येणाऱ्या अवजड ट्रकच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुसानेच्या दुचाकीला पाठीमागून गणपती मंदिराजवळ जोरदार धडक दिली. या धडकेत तो खाली कोसळून गंभीर जखमी झाला. रक्त भांबळ अवस्थेत त्यास परिसरातील रहिवाशांनी व रस्त्याने येजा करणाऱ्या नागरिकांनी तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना काही वेळानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी दुसाने यास तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून या रस्त्यावरून अवजड वाहतुकीला रात्री आठ वाजेनंतर प्रवेश असल्याचे आदेश सूचना शहर वाहतूक नियंत्रण शाखेने काढले आहेत मात्र आंबेडकर नगर व कलानगर येथून सर्रासपणे भरदिवसा व सायंकाळी सुद्धा अवजड वाहने कॅनॉल रोडने पुढे वडाळ्यातून रविशंकर मार्गाने जात असतात. अशी तक्रार नागरिकांनी अनेकवेळा केली आहे.या अवजड वाहनांनी आंबेडकरनगर ते कलानगर पर्यंत मोठ्या संख्येने अनेकांचा जीव घेतला आहे. या घटनेनंतर इंदिरानगर येथील श्री प्रगती सोसायटीत राहणार्‍या दुसाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आदित्य हा फूड कंपनीमध्ये मार्केटिंगची नोकरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. घरात मोठा असल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. त्याच्या पश्चात आई, लहान भाऊ असा परिवार असून तो अविवाहित होता. त्याच्या अपघाती मृत्यूने इंदिरानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यासंदर्भात नागरिकांनी नगरसेवक सुप्रिया खोडे, चंद्रकांत खोडे, दिपाली कुलकर्णी, अजिंक्य साने, रुपाली निकुळे यांच्याकडे तक्रार केली असून यासंदर्भात नगरसेवक काय भूमिका घेतात याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागून आहे

Loading

Previous Post

नाशिकमध्ये खड्डे बुजविण्यासाठी आलेला डंपरच खड्ड्यात

Next Post

सुरक्षारक्षक कुठे? नाशिकच्या रामकुंडात पाच जण बुडाले; चार बचावले, एका मुलाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White