• Latest
  • Trending
नाशिकला महापूराचा धोका! दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी

नाशिकला महापूराचा धोका! दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी

July 23, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकला महापूराचा धोका! दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर

नाशिक : काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला असून या पावसानं नाशिक शहराची पुरती दाणादाण उडाली आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. ऐतिहासिक रामकुंड परिसर आणि आसपासची लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पाण्याचा वेढा इतका वाढला आहे की प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आली आहे. पाऊस अखंड सुरू असल्याने शहरातील वाहतूक आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रामकुंड परिसरातील रामसेतू पूल पाण्याखाली गेला आहे, तर गाडगे महाराज पुलाला पुराचे पाणी टेकले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आणि महापालिकेने गोदाघाट परिसरातील सर्व दुकाने, टपऱ्या आणि स्टॉल्स तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. नदीकाठच्या 3 ते 4 फुटांपर्यंतच्या इमारती आणि घरांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गंगापूर धरणातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सातत्याने वाढवला जात आहे. सध्या धरणातून 12600 ते 13000 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून दुपारी रामकुंड परिसरातील होळकर पुलाखाली पाण्याचा प्रवाह 17390 क्युसेकवर पोहोचला होता. या ठिकाणी इशारा पातळी 13000 क्युसेक तर धोका पातळी 19000 क्युसेक इतकी आहे. गुरुवारी संध्याकाळी पाण्याचा विसर्ग वाढून तो 19000 क्युसेक पार करताच शहरातील सराफ बाजार आणि सखल भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पुराचे पाणी शिरण्याची थेट शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गंगापूर, गौतमी गोदावरी धरण आणि कश्यपी धरण परिसरात अतिवृष्टी सुरू असल्याची माहिती दिली. पुराचे पाणी पाहण्यासाठी नदीकाठावर गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

Loading

Previous Post

त्र्यंबकेश्वरला वादळी वाऱ्याने पत्रे उडून भाविकांच्या अंगावर कोसळले, ३ जण जखमी

Next Post

नाशिकच्या दिंडोरी,पेठ येथे भूकंप, सुरगाण्यात जमिनीला भेगा, इगतपुरीत डोंगर खचला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White