• Latest
  • Trending
संतापजनक ! कायद्याच्या बालेकिल्ल्यात पर्यटक कुटुंबावर जीवघेणा हल्ला

संतापजनक ! कायद्याच्या बालेकिल्ल्यात पर्यटक कुटुंबावर जीवघेणा हल्ला

July 13, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

संतापजनक ! कायद्याच्या बालेकिल्ल्यात पर्यटक कुटुंबावर जीवघेणा हल्ला

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नाशिकच्या इगतपुरीजवळील भावली धबधब्यावर संतापजनक घटना

नाशिक : नाशिक जिल्हा हा धार्मिक त्याचबरोबर पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.पावसाळा सुरू झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर व इगतपुरी परिसरात धबधबे पाहण्यासाठी कुटुंबासह पर्यटकांची मोठी गर्दी असते मात्र आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे धक्कादायक व संताप जनक प्रकार घडला. नाशिक येथील कुटुंब पर्यटनासाठी गेले असता कुटुंबावर स्थानिक टवाळखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. तरुणीच्या छेडछाडीला विरोध केल्यानंतर १५ किलोमीटर पाठलाग करून कारची तोडफोड करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार,  नाशिकच्या अंबड परिसरातील रहिवासी पुनम भागवत या आपल्या कुटुंबासह वीकेंडला निसर्गरम्य भावली धरणावर पर्यटनासाठी गेल्या होत्या. संपूर्ण कुटुंब धबधब्याचा आनंद घेत असताना तिथल्या काही स्थानिक टवाळखोरांनी कुटुंबातील एका तरुणीची छेड काढली. या छेडछाडीला भागवत कुटुंबाने कडाडून विरोध केला आणि टवाळखोरांना जाब विचारला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर पर्यटकांनी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला असता, चिडलेल्या टवाळखोरांनी टोळी जमवून या कुटुंबाचा पाठलाग सुरू केला. हल्लेखोरांनी हातात लाकडी दांडे आणि लोखंडी रॉड घेऊन भागवत यांच्या गाडीचा (कारचा) तब्बल १५ किलोमीटरपर्यंत फिल्मी स्टाईल पाठलाग केला. टवाळखोरांनी केवळ पाठलाग केला नाही, तर रस्त्यात ठिकठिकाणी गाडी अडवून कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.या भयंकर प्रसंगानंतर घाबरलेल्या व भेदरलेल्या पीडित कुटुंबाने थेट नाशिक गाठले आणि या घटनेप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पहिली तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा ग्रामीण भागाच्या हद्दीत घडल्यामुळे आता अंबड पोलीस आणि नाशिक ग्रामीण पोलीस यांच्याकडून संयुक्तपणे पथके तयार करून आरोपींचा कसून शोध घेतला जात. याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त करत नाशिक जिल्हा कायद्याच्या बालेकिल्ल्यात असे प्रकार घडतातच कसे ? असा सवाल केला असून या गावगुंडांना त्वरित अटक करावी असे मागणी देखील जोर पकडून लागली आहे. त्याचबरोबर या घटनेनंतर पर्यटकांचा संरक्षणाचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे

Loading

Previous Post

नाशिकमध्ये मुसळधार पावसाचं तांडव! अर्धवट खोदकामामुळे परिस्थिती अधिक बिकट

Next Post

नाशिकमध्ये 70 लाख लुटणारी बनावट अधिकाऱ्यांची टोळी गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White