• Latest
  • Trending
नाशकात हॉटेल चालकांचे धाबे दणाणले, 7 हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित 

नाशकात हॉटेल चालकांचे धाबे दणाणले, 7 हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित 

July 4, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात हॉटेल चालकांचे धाबे दणाणले, 7 हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित 

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

तुकाराम मुंडेंचा नाशिकमध्ये मोठा दणका!

नाशिक  : तपासणीदरम्यान अनेक हॉटेलांत स्वयंपाकघरातील अस्वच्छतेपासून ते ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने 20 हॉटेल्सची तपासणी करून अस्वच्छता व नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित केले, तर 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश दिले. हॉटेल्समध्ये ग्राहकांना स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावं, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. नाशिक विभागामध्ये दोन दिवसात तब्बल 20 हॉटेल्स आणि अन्नस्थापनाची झाडाझडती करण्यात आली. या कारवाईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 7 हॉटेलचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. परवाना नसलेल्या चार आस्थापना तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळं हॉटेल व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ  उडाली आहे.राज्यभर सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिकमध्ये मोठी धडक कारवाई केली आहे. हॉटेलच्या स्वयंपाकघरात मोठी अस्वच्छता एफडीएच्या तपासणीत अनेक हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळली. ग्राहकांना दिले जाणारे अन्न उघड्यावर ठेवले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे अन्न खराब होण्याची आणि ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनीही स्वच्छतेचे नियम पाळले नसल्याचे आढळले. कोल्ड स्टोरेज आणि अन्न योग्य तापमानात ठेवण्याच्या नियमांचेही उल्लंघन करण्यात आले होते. त्यामुळे एफडीएने संबंधित हॉटेल्सवर कारवाई केली. त्याचबरोबर अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त वातावरणात उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न, निकृष्ट दर्जाची शीतकरण यंत्रणा, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव आणि त्यांची वैद्यकीय तपासणी न करणे अशा गंभीर त्रुटी उघड झाल्या. याशिवाय, नियमानुसार आवश्यक असलेली कायदेशीर कागदपत्रे उपलब्ध नसणे आणि ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा न ठेवणे, या कारणांमुळे या सात हॉटेलांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चार हॉटेल्स पूर्णत बंद अन्न व औषध प्रशासन विभाग नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत. नियम मोडणाऱ्या कोणत्याही अन्न व्यवसायिकास सवलत दिली जाणार नाही. नाशिक विभागातील ही विशेष तपासणी मोहीम यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार आहे. तपासणी दरम्यान चार आस्थापनांकडं वैध अन्न व्यवसाय नोंदणी किंवा परवाना नसल्याचं उघड झालं आहे. त्यामुळं या चारही आस्थापनांना वैध नोंदणी किंवा परवाना मिळेपर्यंत त्यांचा अन्न व्यवसाय पूर्णतः बंद ठेवण्याचे लेखी निर्देश देण्यात आले आहे,” अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.  या हॉटेलांवर कारवाई
हॉटेल ग्रीन वॉल (जत्रा-लिंक रोड, नाशिक)
हॉटेल राधिका (द्वारका, नाशिक)
हॉटेल क्राऊन पॅलेस (पेठरोड, नाशिक)
लक्ष्मी हॉटेल (सिन्नर, नाशिक)
हॉटेल त्रिमूर्ती (एमआयडीसी, जळगाव)
जाधव रेस्टॉरंट (नंदुरबार)
हॉटेल भानू (जळगाव)

Loading

Previous Post

नाशिकमध्ये ज्वेलर्सने बँकेला लावला ३८ कोटींचा चुना

Next Post

कुंभमेळा रस्ते कामांच्या टेंडरमध्ये २२७० कोटींचा घोटाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White