• Latest
  • Trending

नाशिकमध्ये भरवस्तीत सराफ दुकानावर दरोडा

May 16, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकमध्ये भरवस्तीत सराफ दुकानावर दरोडा

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

सात मिनिटांचा थरार आणि कडव्या प्रतिकारामुळे दरोडेखोरांनी काढला पळ

नाशिक : शहरातील हिरावाडी रोड परिसरात असलेल्या न्यू समृद्धी ज्वेलर्स दुकानावर शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान हातात बंदूक घेऊन आलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांनी सोने चांदीचा ऐवज लुटून नेला यादरम्यान दुकान मालक तसेच दुकानातील महिला व कामगारांशी झटापट करत मारहाण करण्यात आली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून भरवस्तीत झालेल्या या धाडसी दरोड्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिरावाडी रोडवर चंद्रभागा अपार्टमेंट गाळा क्रमांक तीन येथे नयना पगारिया यांचे न्यू समृद्धी ज्वेलर्स नावाचे दुकान असून रात्री नऊ वाजता पगारिया महिला कामगार सोनाली पाटील तसेच अमित श्री श्रीमाळ असे तिघेजण दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना दोन दुचाकीवरून सहा जण आले. त्यातील दोघेजण बाहेर थांबले तर तोंडाला मास्क व टोपी परिधान केलेल्या चौघांनी दुकानात प्रवेश करत ज्वेलर्स दुकान मालक पगारिया यांच्यावर बंदूक रोखत दागिने लुटण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दरोडेखोरांना प्रतिकार करताना पगारिया यांनी हातातील ट्रे फेकला. तर सोनाली व अमित यांनीही दरोडेखोरांना प्रतिकाराचा प्रयत्न केला त्यावेळी दरोडेखोर व कामगार यांच्यात झालेला झटापटीत दरोडेखोरांनी हातातील बंदूक अमितच्या डोक्यात उलट्या बाजूने मारली. वर्मी घाव बसल्याने अमित रक्तभांबाळ झाला तरी त्याने एका दरोडेखोराला पकडले मात्र झटापटी त्याचा शर्ट फाटला व त्यानंतर आरडाओरोड केल्यावर दरोडेखोर दुचाकीवरून पसार झाले. या घटनेने परिसर हादरून गेला असून जखमी अमित याच्या डोक्याला 14 टाके पडले आहेत दुकानातून सोन्याचे पदक लहान मुलांचे अंगठी व इतर दागिने दरोडेखोराने लुटून नेल्याची माहिती दुकान मालक पगारिया यांनी दिली सदर घटनेनंतर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पथक घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी दुकानात घुसलेल्या संशयतांनी हात लावलेल्या काही वस्तूचे ठसे नमुने घेतले. घटनेनंतर पोलिसांनी दुकानातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासणी करून त्यावरून संशयीतांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करत शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली. हा सर्व थरार सात मिनिटे चालू होता कडव्या प्रतिकारामुळे दरोडेखोरांनी पळ काढला

Loading

Previous Post

उपजिल्हाधिकारी निलंबित अशोक खरात प्रकरण अंगलट

Next Post

“कॉकरोज” वादात, 50% फॉलोवर्स पाकिस्तानी बांगलादेशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White