निदा खान व कल्पना खरात अनेक दिवसांपासून फरार

नाशिक : राज्यभर गाजत असलेल्या दोन मोठ्या प्रकरणात नाशिकमधील दोन महिला गुन्हेगारांनी पोलीस, तपास यंत्रणा आणि गृहविभागाला मोठे आव्हान दिले असून गेल्या 15 दिवसापासून त्या महिला फरार असून पोलीस त्यांना पकडू शकलेले नाहीत. यामध्ये पहिली महिला कल्पना खरात आहे. भोंदूबाबा अशोक खरात याची पत्नी कल्पना खरातवर शिर्डी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. अशोक खरातच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने कल्पना खरातची दोन वेळा चौकशी केली. मात्र ज्यावेळी शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल झाला तेव्हापासून ती पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाली असून तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 16 एप्रिलला सुनावणी झाली असून तिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे.पोलीस व तपास यंत्रणांना आव्हान देणारी दुसरी आरोपी महिला निदा खान आहे. नाशिकच्या नामांकीत कंपनीमधील महिला अत्याचार आणि धर्मातर प्रकरणातील सूत्रधार असणारी निदा खान 25 मार्चपासून फरार आहे. कंपनीत काम करणार्यांना गरजू मुलींना हेरून एका टोळक्याच्या मदतीने त्यांच्यावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकणे महिला असूनही इतर मुलीवर अत्याचार, छेडछाड विनयभंगच्या घटनेत गुन्हेगारांना मदत करत विकृत मानसिकतेचे दर्शन घडवल्याने तिच्याविषयी समाजामध्ये संतापाची भावना आहे, नीता खान हिचा देखील जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तरीही पोलीस व तर तपास यंत्रणा या महिलेला अद्याप पकडू शकलेले नसल्याने या महिलांनीच पोलिसांना आव्हान दिल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ही नाशिक पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे.

![]()












