युवतींना धर्माबाबत बोलून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या.

नाशिक: मंदिरांचं शहर असलेल्या नाशिक शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.भोंदू अशोक खरात,सातपूरचा कथित पत्रकार एरंडे यांचे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच आता कॉर्पोरेट जगताला हादरवून सोडणारी एक अत्यंत संतापजनक घटना नाशिकमधून समोर आली आहे. एका नामांकित आयटी (IT) कंपनीत कामाला असलेल्या 18 ते 25 वयोगटातील तरुण मुलींचे लैंगिक, मानसिक शोषण आणि विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात जे काही आरोप करण्यात आले आहेत ते अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. लव्ह जिहाद पाठोपाठ हा नवा कॉर्पोरेट जिहादचा काही प्रकार आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत असून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता SIT ची देखील स्थापना करण्यात आली आहे. मुंबई नाका परिसरातील इंदिरानगर भागात ही मल्टिनॅशनल कंपनी असल्याचीचर्चा आहे. या कंपनीतल्या एचआर मॅनेजरकडून धर्मांतरासाठी जबरदस्तीसाठी केली जात होती. नमाज पठण करायला लावलं जायचं, मांसाहारी जेवण खायला लावायचं, हिंदू देवतांबाबत आक्षेपार्ह शब्दात बोललं जात होतं, मुलींना लज्जास्पद वागणूक दिली जायची, मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जायचा, यापैकी पीडित महिला 18 ते 26 वयोगटातल्या आहेत. 2022 पासून असे प्रकार कंपनीत सुरू होते. नाशिकमधल्या या आयटी कंपनीत जे सहा गुन्हे दाखल झालेत, ते प्रचंड धक्कादायक व संतापजनक आहेत. जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान दानिश शेख, तौसिफ अख्तार, निदा खाननं कर्मचारी महिलेच्या धार्मिक भावना दुखावल्या. तौसिफनं धमकावून शारीरिक संबंध ठेवले. इतरांनी ऑफिस लॉबीमध्ये विनयभंग केला. गुन्हा दोनमध्ये, मे २०२३ ते १९ मार्च २०२६ या काळात रझा मेमन, शाहरुख कुरेशीनं ऑफिसमध्ये विनयभंग केला. कंपनीच्या एचआर विभागाकडे याची तक्रार करण्यात आली. पण एचआर अधिकाऱ्यांनीही या दोघांच्या कृत्याला चिथावणी दिली. गुन्हा तीननुसार, शफी शेखनं ऑफिसच्या मीटिंगमध्ये एकटक पाहून तिच्या वैयक्तिक आयुष्यात संतती नसल्याबद्दल लज्जास्पद विधान केलं आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.गुन्हा चारमध्ये म्हटलंय, मे ते डिसेंबर २०२५ मध्ये तौसिफने तरुणीच्या तिच्या खासगी आयुष्याबद्दल लज्जास्पद गोष्टी विचारल्या आणि इतर युवतींना धर्माबाबत बोलून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या.गुन्हा पाच नुसार, तौसिफ अख्तार, दानिश शेख आणि रझा मेमन यांनी तरुणाला त्याच्या धर्मातील देवाबद्दल अपशब्द बोलून विशिष्ट धर्माचे धार्मिक विधी करायला सांगितले. जबरदस्तीनं मांसाहार करायला लावला. त्याच्या धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केला आणि त्याच्या धर्मातल्या महिलांबाबत अश्लील शेरेबाजी केली. गुन्हा सहानुसार, आसिफ अन्सारी आणि शफी शेख या संशयितांनी युवतीचा विनयभंग केला. त्याचबरोबर कार्यालयातून सुट्टी झाल्यानंतर पीडित महिलेचा पाठलाग करत अश्लील शेरेबाजीसुद्धा केल्याचे म्हटले आहे. हिंदू तरुणाला जबरदस्ती धर्मांतर करायला लावले नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील फोटो समोर आले आहेत. याच कंपनीतील एका तरुणाला संशयित आरोपींनी धर्मांतर करायला लावण्याचा आरोप आहे. संशयित तैसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख शेख आणि रजा मेमन यांनी हिंदू तरुणाला धर्मांतर करायला भाग पाडल्याची तक्रार करण्यात आली आहे. कंपनीतील हिंदू तरुणाला दुपारच्या वेळेस नमाज पठण करायला लावली जात असल्याचा आरोप आहे. याशिवाय हिंदू तरुणाला बीफ खाऊ घातल्याचाही फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे. हिंदू तरुणाचे धर्मांतरानंतरचे फोटो समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शोधासाठी पोलीस पथके रवाना नामांकित आयटी कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणात ८ पैकी ६ जाणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन महिला आरोपी फरार आहेत. या कंपनीतील ऑपरेशन मॅनेजर आणि एक महिला आरोपी फरार आहे. पीडितांनी महिला मॅनेजरकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. दोन्ही फरार महिला आरोपींच्या शोधासाठी नाशिक पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. महिला कर्मचाऱ्यांचं शोषण, मानसिक छळ प्रकरणी नाशिक पोलिसांत आत्तापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस उपायुक्त संदीप मिटके यांच्याकडे एसआयटीची जबाबदारी देण्यात आली आहे. घाबरू नका तक्रार करा नाशिक पोलिसांनी या प्रकरणातील पीडित महिलांना न घाबरता पुढे येण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारच्या छळाला बळी पडलेल्या इतर मुलींनी संकोच न बाळगता तक्रार नोंदवावी, त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. नाशिकसारख्या प्रगत शहरात आयटी हबमध्ये घडलेल्या या घटनेने महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.घडलेल्या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.पोलीस आयुक्त व्हॉट्सॲप क्रमांक ९९२३३२३३११ या क्रमांकावर संदेश पाठवावा किंवा नियंत्रण कक्षाशी ११२ या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. तक्रारदार महिला, संस्था किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तींची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी म्हटले आहे.

![]()












