कल्पना खरातच्या अटकेसाठी दोन पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेने रवाना

Nashik : शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केलेल्या अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार असून मुलाला एसआयटीने राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे कल्पना खरात यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या फरार झाल्याची माहिती आहे. कल्पना खरातच्या अटकेसाठी दोन पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेने रवाना झाली आहेत. शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांनी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर तिघे अशा पाच जणांविरोधात जमीन बळजबरी खरेदी केल्याची आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणात अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना अटक केली आहे. रावसाहेब गोंदकर यांच्यावर सुरूवातील १५ लाखांचे पतसंस्थेचे कर्ज झाले होते. किरण सोनवणे आणि बावके यांनी आणखी मोठे कर्ज उभारण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्यावरील कर्ज २ कोटी ५ लाखांवर पोहोचले. त्यानंतर सोनवणे आणि बावके यांनी अशोक खरात सोबत गोंदेकर यांची भेट घालून दिली. गोंदेकर यांची जमीन गहाण ठेवून पैसे घेण्याचे ठरले होते. पण, ऐनवेळी गोंदेकर यांच्यावर दबाव टाकून जमीनच खरातच्या नावावर करण्यात आली. त्यानंतर खरातने जमीन व्यवहाराचेच पैसे व्याजाने दिले आणि त्याची वसुलीही केली, असा आरोप गोंदेकर यांनी केलेला आहे. कारवाई गोविंद नगर परिसरातील कर्मयोगी भागात असलेल्या तृप्त बाला या त्यांच्या निवासस्थानी करण्यातकरण्यात आल्याचे समजते

![]()












