चौकशीत दोषी असल्यास कठोर कारवाई जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात हरियाणा येथील एका भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आले आहे. या प्रकारानंतर भाविकांमधून संताप व्यक्त केला जात असताना देवस्थान ट्रस्टचे मात्र सदर भाविकांनीच अगोदर सुरक्षारक्षकाची वाद घालत मारहाण केल्याचा दावा केला असून तसे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध केले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एक भाविक गर्भगृहाजवळ दर्शनासाठी आला असता त्याचा तेथील नियुक्त सुरक्षारक्षकाबरोबर वाद झाला. यावेळी सदर सुरक्षा रक्षकाने त्याला ढकलले असतात दोघांमध्ये बाचावाची झाली त्याच वेळी अन्य सुरक्षारक्षकांनी एकत्र येत सदर भाविकाला मारहाण करत बाहेर काढण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या घटनेनंतर देवस्थानामधील सुरक्षा रक्षकांचा गैरवर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाविकांवर हात उचलण्याची ही सहावी घटना 16 ऑगस्ट 2025 : भाविकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली होती. . 14 जानेवारी 2024: मकर संक्रांतीच्या दिवशी गर्दी वाढल्यामुळे रांगेत उभे असलेल्या भाविकांशी सुरक्षा रक्षकांचा वाद झाला यावेळी काही भाविकांना धक्काबुक्की करण्यात आली. 11 सप्टेंबर 2023 : श्रावणी सोमवारच्या दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी होती यावेळी व्हीआयपी दर्शक आणि सामान्य रांगेतील वादावरून सुरक्षा रक्षक आणि भाविकांमध्ये बाचाबाची झाली काही भाविकांनी मारहाणीचा आरोप केला होता. 4 मे 2023 : उत्तर भारतातील काही भाविक दर्शनासाठी आले असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना अर्ध्या रस्त्यात अडवल्याने वाद झाला यावेळी बाचाबाचे रूपांतर हाणामारी झाली होती. 5 जानेवारी 2023: नवीन वर्षाच्या सुरुवातीला दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या एका गटाला सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याची तक्रार त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. सर्व स्तरातून संताप व्यक्त—- त्र्यंबकेश्वर इगतपुरी चे आमदार हिरामण खोसकर यांनी या प्रकरणाची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले तर नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांनीही मारहाण करणाऱ्या सुरक्षारक्षकांना बडतर्फ करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही या मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल आणि त्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. अखेर गुन्हा दाखल—— पोलीस शिपाई अमोल बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरक्षारक्षक पप्पू तानाजी आचारी व तुकाराम उमेश बुरुंगे राहणार त्रंबकेश्वर यांच्यासह अन्य तीन ते चार सुरक्षारक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी स्वतःहून घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.

![]()












