• Latest
  • Trending
अजून कोण-कोण म्हणणार… नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला !

अजून कोण-कोण म्हणणार… नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला !

October 12, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

अजून कोण-कोण म्हणणार… नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला !

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

राजकीय क्षेत्रात खळबळ मात्र पोलिसांच्या मोहिमेचे सर्वसामान्य करत आहेत स्वागत

नाशिक : शहरात गुन्हेगारी वाढल्यानंतर टीकेचे धनी झालेल्या पोलीस खात्याने रूद्र-अवतार धारण करत गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्यास सुरुवात केली. मात्र यामध्ये शहरातील प्रमुख राजकीय नेत्यांचाच अधिक भरणा निघाल्याने नाशिककरांना रोज त्या नेत्यांना बघून धक्क्यावर धक्के बसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्याची मोकळीक दिल्याने पोलिसांनी आपले रूद्र-रूप दाखवण्यास सुरवात केली. याला निमित्त ठरले ते सातपूर येथील एका हॉटेलमधील गोळीबाराचे मग काय राजकीय नेत्याच्या रुपात गुंडगिरी करणाऱ्या गुंडांच्या नांग्या ठेचण्यास सुरवात केली. सुरवातीला गोळीबाराच्या संशयित म्हणून भूषण लोंढे याचे नाव आले त्यानंतर मात्र माजी नगरसेवक आणि रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, दीपक लोंढे यांना अटक करण्यात आली मुख्य म्हणजे लोंढे हे माजी नगरसेवक असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.त्यांना अटक करून न्यायालयात नेताना..नाशिक जिल्हा.. कायद्याचा बालेकिल्ला म्हणून पिता-पुत्राकडून वदवून घेण्यात आले. त्यानंतर नंबर होता तो मामा राजवाडे यांचा नुकताच त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेला रामराम करत भाजप मध्ये प्रवेश केला होता. मामा हे सुनील बागुल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.त्यांना देखील सरकारवाडा हद्दीत झालेल्या गोळीबारात संशयित म्हणून पाहिले जात आहे.त्यांना सुद्धा न्यायालयात नेताना ..नाशिक जिल्हा.. कायद्याचा बालेकिल्ला म्हणून त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले. त्यानंतर मात्र आज रविवार असल्याने शांतता असेल असे नागरिकांना वाटत असतानाच आज पुन्हा नाशिक जिल्हा.. कायद्याचा बालेकिल्ला हे शब्द कानी पडले यावेळी नंबर होता अजय बागुल याचा गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या अजय बागुल याला क्राईम ब्रांचच्या टीमने मध्यप्रदेश येथून अटक केल्याचे समजते.त्याचे साथीदार सचिन कुमावत,पप्पू जाधव यांना देखील अटक करण्यात आली आहे मुख्य म्हणजे याआधी अटक करण्यात आलेले गौरव बागुल, सागर बागुल यांच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या हे तिघेही सुनील बागुल यांचे पुतणे असल्याची चर्चा आहे. तर आज संध्याकाळी प्रकाश लोंढे याचे कार्यालय तपासताना पोलीस देखील चक्रावून गेले कारण या संपर्क कार्यालयात छुपे भुयार आढळून आले . याचा वापर नेमका कश्यासाठी केला जात होता याचा शोध पोलीस घेत आहेत. सातपूर,अंबड परिसरात पी एल ग्रुप या नावाने लोंढे ओळखले जातात. या टोळीच्या अनेक तक्रारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर सिडको परिसरात असलेला भाजपचा माजी नगरसेवक याची देखील पोलिसांनी कसून चौकशी केली असल्याचे समजते. आतापर्यंत पोलिसांच्या रडारवर भाजप आणि शिंदे गटाचे नेते असलंयाचे चित्र आहे. मात्र यापुढे अजून कोण असू शकतो हे पोलिस दलच सांगू शकते. राजकारणात मातब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांची ही परिस्थिती बघून त्यांच्या नावावर दबंग गिरी करणाऱ्या भाईंचे धाबे दणाणले असून पोलिसांचे असे रूप बघून चांगल्या-चांगल्याचची बोबडी वळाली आहे. यामुळे राजकीय नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्था पसरली आहे कोण जाणे उद्या नाशिक जिल्हा.. कायद्याचा बालेकिल्ला म्हणून बोलणारी व्यक्ती कोण असेल

Loading

Previous Post

नाशिकच्या कुख्यात टिप्पर गॅंगवर “मोक्का”

Next Post

 हे नाशिक आहे भावा, इथं जर तू इज्जत दिली नाहीतर… तुझी डेडबॉडी…. 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White