पूजनाचा मुहूर्त रात्री 10.45 पर्यंत

नाशिक : आज लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त रात्री 10.45 पर्यंत राहणार आहे आज दुर्मिळ योग आला असून नरक चतुर्थीच्या दिवशी अमावस्येस दुपारी 3.52 वाजता प्रारंभ झाला. शुक्रवारी (दिनांक 1)सायंकाळी 6.16 वाजता अमावस्या समाप्ती होईल. सूर्योदयापासून दिवसभर अमावस्या आहे. सूर्यास्तानंतर एक घटी अमावस्या असेल. या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. यंदा सलग दोन दिवस अमावस्या आली आहे. या सारखा योग 1962,1963,2013 च्या दिवाळीत आला होता. दिवाळीतील ही अमावस्या शुभ मानली जाते. लक्ष्मीपूजन या वेळेत- आज दुपारी 3 ते 5.15,सायंकाळी 6 ते 8.30 रात्री 9.10 ते 10.45 पर्यंत मुहूर्त असल्याचे जाणकार सांगतात तर 6.50 ते 8.40 सर्वोत्तम मुहूर्त आहे. लक्ष्मीपूजन करा असे—- चौरंगावर लाल कापड टाकावे. त्यावर तांदूळ टाकून कलश ठेवावा, त्या कलशावर प्लेट ठेऊन त्या प्लेटवर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवावी व त्या मूर्तीची पूजा करावी. लक्ष्मीचा फोटो ठेवावा व विडा ठेवावा, विड्यावर नारळ ठेवावे, सुरवातीला गणपतीची पूजा करावी नंतर लक्ष्मी मातेची पूजा करावी शेवटी मनोभावे आरती करावी, त्यानंतर दिवा, धूप जाळावे, प्रार्थना व मंत्राचा जप करणे, फुलांची, फळे, मिठाई अर्पण करून आरती करणे, बत्तासे, लाह्याचा नेवेद्य दाखवावा .केरसुनीचे पूजन करावे


![]()











